Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याखवले मांजराच्या तस्करीप्रकरणी ४ संशयितांना सात दिवसाची पोलीस कोठडी...

खवले मांजराच्या तस्करीप्रकरणी ४ संशयितांना सात दिवसाची पोलीस कोठडी…

माडखोल येथे कारवाई; सात जणांना घेतले होते ताब्यात…

सावंतवाडी ता.१५: खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी येथील वनविभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेल्या सात पैकी चार संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.यात एकाची प्रकृती खालावल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.तर अन्य दोघांना समज देऊन  सोडण्यात आले.दरम्यान या गुन्ह्यात आणखीन तीन संशयितांचा समावेश असून ते सध्या फरार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.याबाबतची अधिक माहिती मिळवण्यासाठी ही कोठडी मागण्यात आली आहे.याकामी संशयित आरोपींच्या वतीने अॅड.सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments