Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभालचंद्र महाराज जन्मोत्सवात ११६ रक्तदात्याचे रक्तदान...

भालचंद्र महाराज जन्मोत्सवात ११६ रक्तदात्याचे रक्तदान…

कणकवली, ता.१५ : परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११६ व्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात सुरु आहेत. आज सकाळी संस्थानच्या वतीने रक्तदान शिबीराचे झाले. या शिबिराचा शुभारंभ संस्थांचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या हस्ते करण्यात आला. ११६ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेत. बाबांच्या ११६ व्या जन्मोत्सवातील ११६ रक्तदात्याचा संकल्प पूर्ण केला. या रक्तदात्यांचे संस्थानच्या वतीने पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले. यावेळी कणकवली कॉलेजचे सचिव विजयकुमार वळजु,अनंत सौदागर,प्रवीण पारकर,नगरसेवक रुपेश नार्वेकर, डॉ.विद्याधर तायशेटे, उमेश वाळके, प्रसाद अंधारी, व्यवस्थापक विजय केळुसकर, बाळा सापळे, श्रीरंग पारगावकर, तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णलाय रक्तपेढी विभागाचे डॉ. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णलाय रक्तपेढी विभागाचे डॉ राजेश पालव, हेमांगी रणदिवे, आदी उपस्थित होते.
भालचंद्र महाराज संस्थानच्या वतीने धार्मिक कार्यक्रमासोबतच संस्कृतिक, शैक्षणिक,आरोग्य विषयक उपक्रम गेले कित्येक वर्षे घेतले जातात.या उपक्रमासाठी बाबांचे भक्तगण तसेच शहरातील नागरिक,मंडळे,सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातूनच हा उपक्रम यशस्वी करत असल्याचे सुरेश कामत यांनी सांगीतले.
फोटो – रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना सुरेश कामत,विजयकुमार वळजु,अनंत सौदागर,प्रवीण पारकर,रुपेश नार्वेकर,डॉ.विद्याधर तायशेटे,उमेश वाळके आदी

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments