ठसका लागल्याने तरुणाचा मृत्यू

336
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.१५: रात्री जेवत असताना ठसका लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ११. वाजण्याच्या सुमारास घडली. सतीश बाळासो कागवाडे वय ४४ वर्षे राहणार साखरवाडी दुधगाव ता. मिरज, जि. सांगली सध्या राहणार हेत असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत सतीश बाळासो कागवाडे हे मंगळवारी रात्री मित्रांसमवेत जेवत असताना त्यांना ठसका लागून उलट्या सुरू झाल्या. यात त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचे मित्र पंढरीनाथ भोसले यांनी उंबर्डे येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणाची खबर पंढरीनाथ भोसले यांनी वैभववाडी पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. दरम्यान मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलिस नाईक वाय. व्ही. तांडेल करीत आहेत.