वैभववाडी ता.१५: खोपोली जि. रायगड येथील कै. अंजू धर्मा बांगारे वय ५४ वर्षे या महिलेचा ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे. वैभववाडी पं. स. चे कनिष्ठ अभियंता मनोज बांगारे यांच्या त्या मातोश्री होत. मयत अंजू बांगारे या रविवारी खोपोली मोगलवाडी येथील कार्ला एकविरा देवीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. त्या देवीच्या निस्सीम भक्त होत्या. मंदिराच्या पायऱ्या चढत असताना श्रीमती बांगारे यांना ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यात त्या जागीच कोसळल्या. त्यांच्या अचानक जाण्याने भाविकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुन, जावई, दिर व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फोटो- अंजू बांगारे