विलवडे-टेंबवाडी येथे वॅगनआर कार ३० फूट खोल दरीत कोसळली…

476
2

दोघे जखमी; रस्त्याचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात…

बांदा ता.१६: बांदा-दाणोली मार्गावर विलवडे-टेंंबवाडी येथे ३० फूट खोल दरीत कोसळून वॅगनआर कार अपघातग्रस्त झाली. या अपघातात कार मधील पणजी-गोवा येथील दोघेजण जखमी झालेत.हा अपघात पहाटे साडेतीन वाजता झाला.येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून ठेकेदाराने उपाययोजना न केल्याने वारंवार अपघात होत आहेत.महिनाभरापूर्वी १३ वर्षाचा शालेय विद्यार्थी याठिकाणीच २० फूट खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झाला होता.

4