सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होणार…

167
2

प्रदेशाध्यक्षांच्या सूचना;ती वादग्रस्त सही आपलीच, थोरात यांचे म्हणणे…

मुंबई.ता.१६:  येथील
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन नव्याने जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष निवडण्याच्या सुचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत. त्यासाठी पक्ष निरीक्षकांनी सिंधुदुर्गचा दौरा करावा अशा सूचनाही त्यांनी केल्याचे समजते
नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी थोरात यांची भेट घेतली यावेळी पक्ष संघटना वाढीवर चर्चा झाली.यावेळी
पालिका निवडणूक काळात नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या दिलीप नार्वेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रावर असलेली सही माझीच होती.असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या वादावर पडदा टाकला असून काँग्रेसमध्ये निर्माण झाली.दुफळी पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

4