जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार काशिराम गायकवाड यांना जाहीर…

222
2

ओरोस ता.१६: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार कुडाळ येथील युवा पत्रकार काशिराम दादू गायकवाड (रा.डिगस) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि.17 जानेवारी रोजी एमएमआरडीए मैदान, वांद्रे – कुर्ला काॅम्प्लेक्स मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता समूहांचे कार्यक्रम, उपक्रम यांची दिलेली प्रचार व प्रसिद्धी विचारात घेऊन एका सर्वोत्कृष्ट पत्रकाराला राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार अंतर्गत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. यासाठी कुडाळ येथील पत्रकार काशिराम गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री कार्यक्रम 17 जानेवारी रोजी वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. या प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री.गायकवाड यांना सन्मानित करण्यात येणार असून त्यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

4