बंदीवानाच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी “घंटानाद आंदोलन”…

178
2

सावंतवाडी मनसेचा इशारा; उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना इशारा…

 

सावंतवाडी ता.१६: येथील कारागृहात संशयास्पद मृत्यू झालेल्या राजेश गावकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी,या मागणीसाठी २६ जानेवारीला येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालया समोर घंटानाद आंदोलन करू,असा इशारा आज मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.आज याबाबतचे पत्र कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मोहिते यांना दिले.यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे,विठ्ठल गावडे,आशिष सुभेदार,संतोष भैरवकर,ललिता नाईक,शुभम सावंत आदी उपस्थित होते.

4