सावंतवाडी भाजी मार्केटमधील उघडी गटारे अखेर “बंदिस्त”…

206
2

नगराध्यक्षांचा पुढाकार;अनेक वर्षांनी प्रश्न सुटल्याने व्यापा-यात समाधान…

सावंतवाडी.ता,१६: येथील बाजारपेठेतील संत गाडगेबाबा भाजी मंडईतील गटारे अखेर बंदिस्त करण्यात आली आहेत.
यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुढाकार घेतला. दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आठ दिवसात गटारे बंदिस्त केली आहे.त्यामुळे व्यापारी व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.सावंतवाडी पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजीमंडई मधील गटारे उघडी होती.त्यावर टाकण्यात आलेली झाकणे तुटली होती. ती झाकणे बसवण्यात यावीत अशी मागणी गेले.अनेक वर्षे होती याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते.अखेर आज हे काम पूर्ण करण्यात आले आहे.परब यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्या नंतर त्यांनी विकास कामाचा धडाका लावला खड्डे बुजवण्यात सोबत फुटपाथ वर असलेले खड्डे बुजवले आहेत तसेच शहरातील अन्य कामांना सुरुवात केली.

4