नियमित कर्जदारांना सरसकट नुकसान भरपाई दयावी…

2

वेंगुर्ल्यातील शेतकऱ्यांची, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी….

सिंधुदुर्गनगरी.ता,१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असून हजारो कर्जदारांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे. अनेकांनी तर दागिने गहाण ठेवून हात उसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्ज नियमित करून घेतले आहेत. मात्र राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरून आमची चूक झाली का ? असा प्रश्नही या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये प्रसंगी पदरमोड करून नियमित कर्जाची परतफेड करीत आलेल्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणे अपेक्षित आहे. राज्य शासनाने याचा गांभीर्याने विचार करुन नियमित कर्जदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी संतोष गाडगीळ, मिलिंद पाटिल, सुशांत नाईक, प्रकाश गडेकर, बापू नाईक, समीर कुडाळकर, सचिन दाभोलकर, सुभाष जोशी, शेखर परब, अण्णा वजराटकर, प्रमोद कांबली आदि शेतकरी उपस्थित होते.

1

4