वेंगुर्ले तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उद्या महत्वाची सभा…

118
2

वेंगुर्ले.ता.१६: वेंगुर्ले तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकारिणी, बुथ अध्यक्ष, ग्रामकमिटी अध्यक्ष ,तालुका व शहर महिला, युवक कार्यकारिणीची महत्वाची सभा उद्या शुक्रवार १७ जानेवारी रोजी सकाळी ठीक ११.००वाजता आयोजित करण्यात आली आहे.

पक्ष निरिक्षक श्री बाळ कनयाळकर यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले कॅम्प येथील डान्टस काॅलनी जवळ, नक्षत्र इलेव्हन काॅम्प्लेक्स मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यालयात ही सभा होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य, महिला, युवक कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व क्रियाशील सभासद यांनी सदर सभेस वेळीच उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष धर्माजी बागकर व शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी केले आहे.

4