“स्वच्छ सर्वेक्षण २०२०” मध्ये पहिल्या पन्नास क्रमांकात सावंतवाडी नगरपालिका असावी…

231
2

 

संजू परब; स्वच्छतेसंदर्भात हॉटेल व्यवसायिकांच्या बैठकीत माहिती…

सावंतवाडी ता.१६: मागच्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेने केलेली कामगिरी पाहता या वर्षी सुद्धा देशात पहिल्या पन्नास क्रमांकात सावंतवाडी नगरपालिका असावी,अशी आकांक्षा आहे.त्यासाठी स्वच्छता व सुंदरता जपून सावंतवाडीतील नागरिकांनी आणि विशेषतः हॉटेल व्यवसायिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे,अशा सूचना नगराध्यक्ष संजू यांनी आज येथे दिल्या.स्वच्छ सर्वेक्षण २०२० संदर्भात माहिती देण्यासाठी आज येथील पालिकेच्या सभागृहात हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,आरोग्य सभापती परीमल नाईक,नगरसेविका दीपाली भालेकर,दीपक म्हापसेकर आदी उपस्थित होते.
भारत सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणारे स्वच्छ सर्वेक्षण २०२० सर्व ठिकाणी सुरू आहे.तर येत्या ३१ जानेवारीपर्यंत हे पथक सावंतवाडी शहराला भेट देऊन पाहणी करणार आहे.यात विशेषतः हॉटेल व्यावसायिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.त्यासाठी कचऱ्या संदर्भात ओला कचरा,सुका कचरा व घरगुती घातक कचरा,असे वर्गीकरण केलेले तीन डबे प्रत्येकाच्या हॉटेलमध्ये असणे गरजेचे आहे.हे पथकाचे अधिकारी केव्हाही भेट देऊन पहाणी करू शकतात,मात्र या पाहणी दरम्यान काही ठिकाणी व्यवसायिक आणि स्वच्छ सर्वेक्षण पथकाचे अधिकारी यांच्यात गैरसमजातून वाद झाले आहेत.ती परिस्थिती याठिकाणी उद्भवता कामा नये,त्यासाठी या पाहणी दरम्यान आलेल्या अधिकाऱ्यांना सर्व हॉटेल व्यवसायिकांनी सहकार्य करावे,त्यांना कोणताही अडथळा निर्माण करु नये,असे आवाहनही या बैठकीत उपस्थित हॉटेल व्यवसायिकांना करण्यात आले.

 

4