निरवडे येथे शिवसेना पुरस्कृत खुली ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा…

189
2

सावंतवाडी ता.१६: श्री देव भूतनाथ कला-क्रीडा मंडळ,निरवडे यांच्या वतीने शिवसेना पुरस्कृत निरवडे येथील हॉटेल हिल्स साई धाब्या जवळ दि.१८ ते १९ जानेवारी या कालावधीत भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पंधरा हजार रुपये व चषक तर द्वितीय पारितोषिक दहा हजार रुपये व चषक तसेच इतर वैयक्तिक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

4