गजानन पानपट्टेंची माहिती; पाचव्या संशयिताला आज न्यायालयात हजर…
सावंतवाडी ता.१६: येथील खवले मांजर तस्करी प्रकरणातील गुन्ह्यात आणखीन काहींची नावे पुढे येत आहेत.याप्रकरणी आज चार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली,अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी गजानन पानपट्टे यांनी दिली.दरम्यान १४ जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या ५ संशयितां पैकी एकाला आज येथील न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारी पर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे.
ही कारवाई मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व वनविभागाच्या पथकाने केली होती.यात सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.यापैकी दोघांना काल समज देऊन सोडण्यात आले.यापैकी चौघांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .तर उमेश बाळा मेस्त्री याची प्रकृती खालावल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते.दरम्यान त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी त्याला सहा दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे.