Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
महसूल विभागाची चिंदर तेरईत धडक कारवाई…
मालवण, ता. १६ : अवैधरित्या वाळू उपसा विरोधात महसूल प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत आज सायंकाळी उशिरा चिंदर तेरई येथील वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन होड्या जाळल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाल्याचे कळते. या कारवाईमुळे अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईबाबत महसूल प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळल्याचेही यानिमित्ताने दिसून आले. या कारवाई बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
Download WordPress Themes Nulled and plugins.