नितेश राणेंचा सवाल; केसरकरांनी राजीनामा देऊन आपला शब्द पाळावा…
कणकवली ता.१६: चांदा ते बांदा योजना बंद करून शासनाने कोकणावर अन्याय केला आहे, त्यामुळे केसरकरांनी सरकारमधून बाहेर पडणार,अशा फक्त सुक्या धमक्या देऊ नयेत,त्यांच्यात आहे का दम?,असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.नारायण राणे यांनी कोकणा पेक्षा कधीच कुठले पद महत्त्वाचे मानले नाही.त्यामुळे स्वतःची तुलना राणेंशी करणाऱ्या केसरकरांनी आता आपला शब्द पाळावा व योग्य ती भूमिका जाहीर करावी,असेही श्री.राणे यांनी म्हटले आहे.
चांदा ते बांदा योजना बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी आपण आमदारकी पणाला लावेन,असा इशारा माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिला होता.या इशाऱ्यानंतर आज चांदा ते बांदा योजना कायमची बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेतला आहे .या पार्श्वभूमीवर श्री.राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केसरकरांवर टीका केली आहे.