सावंतवाडी-जुना सालईवाडा येथे भंगार दुकानाला आग…

229
2

सावंतवाडी ता.१७: जुना सालईवाडा येथील मामलेदार कार्यालय परिसरात असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला आग लागून परिसरातील भंगार सामान जळून खाक झाले.ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.काशिनाथ बळवंत जोशी,असे संबंधित दुकान मालकाचे नाव आहे.तर या आगीत किरकोळ नुकसान झाले आहे.दरम्यान पालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे या आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले.

4