दहावी बॕचचा वर्ग पुन्हा गजबजला; अविस्मरणीय क्षण सोहळा
वैभववाडी.ता,१७: भुईबावडा येथील आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयातील सन १९९७ च्या दहावी बॕचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मुंबई येथील शिरोडकर हायस्कूल परेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. विशेषतः या कार्यक्रमाची सुरूवात ‘जन गन-मन या राष्ट्रगीताने करण्यात आली. रविवारचा दिवस अविस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाची सुरूवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तब्बल २१ वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनंतर गरूवर्य श्री. भोसले, श्री. ओऊळकर, श्री. पाटील यांना आपले मनोगत व्यक्त करताना भावूक झाले. जुन्या आठवणीने अक्षरशः अश्रूंचा बांध फुटला.
रविवारचा दिवस हा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. आम्ही ज्या संस्थेत घडलो, अर्थात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या ‘रयत शिक्षण संस्था’ या संस्थेचे एक रोपट होत. आज त्या रोपट्याच वटवृक्षात रूपांतर झालं आहे. या वटवृक्षाखाली हजारो विद्यार्थी या संस्थेने घडविले. याचा आम्हांला अभिमान वाटतो. असे गौरोद्गार माजी विद्यार्थ्यांनी काढले.
तब्बल २१ वर्षांनी एकत्र आलेल्या मित्र मैत्रीणींनी गप्पा गोष्टी करीत जुने किस्से, जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांच्या सुख दुःखाबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येकाचा रुणानुबंध आजही आपल्या शाळेशी तितकाच जोडलेला आहे.
खरतर ज्यांच्यामुळे ही भेट शक्य झाली त्या निलिमाताई घुगरे-सरफरे. यांनी गुरुजनांना आपल्या घरी चार दिवस पाहूणचार केला. विशेषतः त्यांनी गेली चार दिवस सुट्टी घेऊन त्यांची सेवा केली. त्यांनी घडविलेले मुंबई दर्शन, शाळेप्रती, गुरूजनांप्रती असलेले त्यांचे प्रेम त्यांच्या कार्यातून दिसून येत होते. या कार्यक्रमाला शंभर विद्यार्थी उपस्थित होते.