दीपक केसरकरांनी जाहीर केलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा…

562
2

परशुराम उपरकर;मनसेची जिल्हा कार्यकारणी नव्याने स्थापन होणार…

 

सावंतवाडी ता.१७: पालकमंत्री असताना दिपक केसरकर यांनी जाहीर केलेली चांदा ते बांदा योजना आता बंद पडली आहे.त्यामुळे आता त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आपले आंदोलन कधी करणार याची तारीख जाहीर करावी,आमचा त्याला पाठिंबा असेल,असा टोला मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे लगावला.दरम्यान जिल्ह्याच्या मनसेच्या कार्यकारणीत नव्याने बदल करण्यात येणार आहेत.लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होईल,आता पक्ष जिल्ह्यात नव्या रूपाने दिसणार आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.श्री.उपरकर यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी श्री.केसरकर यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले,पालकमंत्री असताना केसरकर यांनी अनेक घोषणा केल्या.कोट्यावधी रुपये आणल्याचे सांगितले,परंतु प्रत्यक्षात मात्र काहीही विकास झालेला नाही.चष्म्याचा कारखाना,सेट-टॉप बॉक्स दिसत नाही,तर दुसरीकडे मावळते जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी फक्त शंभर कोटी रुपये जिल्ह्यासाठी आल्याचे सांगितले.त्यामुळे केसरकर उघडे पडले आहेत.तर नुकतेच केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे चांदा ते बांदा योजना बंद पडल्यास आपण पण आंदोलन करू,प्रसंगी राजीनामा देऊ,असे म्हटले होते.मात्र काल तसा आदेश शासनाकडून पारित झाला आहे.त्यामुळे आता केसरकरांनी आपले आंदोलन करावे मनसे त्याला निश्चितच पाठिंबा देईल,असेही श्री.उपरकर म्हणाले.

4