प्रमोद जठार : सुहास गवंडळकर यांचा सत्कार
वेंगुर्ले.ता.१७:
भाजपमध्ये नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार करून निर्णय घेतले जातात. प्रत्येकाला येथे काम करण्यास संधी आहे. तालुका अध्यक्ष म्हणून बाळू देसाई यांनी सुंदर असे काम केलेले आहे. तसेच काम नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर सर्वांना बरोबर घेऊन करतील याची खात्री आहे. त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यात यापुढील काळात भाजपा एक नंबरचा पक्ष राहील असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
वेंगुर्ले कार्यालयात भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले चे नुतन तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांचे अभिनंदन
जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा चिटनीस साईप्रसाद नाईक, बाबा राऊत, माजी उपसभापती स्मिता दामले, सुषमा प्रभुखानोलकर, रिमा मेस्त्री, बबली वायगंणकर, नगरसेवक धर्मराज कांबळी, साक्षी पेडणेकर, दादा केळुसकर, जयंत मोंडकर, वसंत तांडेल, बाळू प्रभू, शंकर घारे, राजन रेडकर, गणपत केळुसकर, विलास रगजी, किर्तीमंगल भगत, वृंदा गवंडळकर, विनय गोगटे, मनवेल फर्नांडिस यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष गिरप, बाळू देसाई, सुहास गवंडळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.