तालुका कृषी आत्मा अंतर्गत तालुक्यातील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना…

168
2

वैभववाडी.ता,१७:  वैभववाडी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुक्यातील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. बारामती येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनला अभ्यास दौऱ्यातील शेतकरी भेट देणार आहेत. या शेतकरी सहलीचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, माजी सभापती बाप्पी मांजरेकर यांच्या हस्ते वैभववाडी येथे करण्यात आला. या अभ्यास दौऱ्यात आत्मा समिती अध्यक्ष महेश रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, सचिव राकेश हुले, कृषी सहाय्यक मुकेश माळी, अमेय पावले, संतोष कडू, हरिश्चंद्र माने, प्रकाश रावराणे, नारायण मोहिते, प्रदिप मांजरेकर, उत्तम गवस, दिपक इस्वलकर, उदय सावंत, हेमंत पाटील, संजय कदम, अनिल गुरव, स्वप्नील कानडे आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.

4