वेंगुर्ला नगरपरिषद स्वछता, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२०
वेंगुर्ला: ता.१७
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वछता क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२० अंतर्गत सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या मान्यतेने व तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने वेंगुर्ला कॅम्प क्रीडांगण येथे घेण्यात आलेल्या कुमार, कुमारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात मालवण संघाने तर कुमारी गटात सावंतवाडी संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे उदघाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, नगरसेवक शीतल आंगचेकर, स्नेहल खोबरेकर, कृपा गिरप- मोणकर, कृतिका कुबल, साक्षी पेडणेकर, न प अधिकारी खतकर, म्हाकवेकर, कर्मचारी पंकज केळुसकर सहित इतर उपस्थित होते. या स्पर्धेत कुमार गटात एकूण १६ संघ सहभागी झाले होते. यावेळी वेंगुर्ला व कणकवली तसेच कुडाळ व मालवण यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात वेंगुर्ला व मालवण संघाने अंतिम सामन्यात मजल मारली. तर अंतिम सामन्यात मालवण संघ ४ गुणांनी विजेता तर वेंगुर्ला संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट चढाई म्हणून संकेत साटेलकर, अष्टपैलू खेळाडू खेळाडू म्हणून भक्तीयश साळगावकर तर उत्कृष्ट पकड म्हणून ललित चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. तर कुमारी गटात एकूण ८ संघ सहभागी झाले होते यात सावंतवाडी संघ विजेता तर कुडाळ संघ उपविजेता ठरला. पंच प्रमुख म्हणून दाजी रेडकर यांनी काम पाहिले तर
तुषार साळगावकर यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले.