दारू वाहतुक प्रकरणी सावंतवाडीतील दोघे ताब्यात…

314
2

उत्पादन शुल्कची कणवलीत कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त….

ओरोस ता.१७:  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई गोवा महामार्गावर ओसरगांव नविन टोलनाका येथे आज पहाटे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूकिवर कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 80 हजार रुपयांच्या अवैध दारू सह एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीची अवैधरित्या वाहतूक केल्या प्रकरणी तेजस दिनेश गिरी (26) रा. माठेवाडा सावंतवाडी व आत्माराम लक्ष्मण आरोंदेकर (27) रा. सातार्डा सावंतवाडी यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4