विषारी द्रव्य प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू…

162
2

दारूम येथील घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट…

कणकवली, ता.१७: तालुक्यातील दारूम (गावडेवाडी) येथील निळकंठ रमेश वारीक (वय २५) या युवकाचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने आज मृत्यू झाला.त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. येथील खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.सायंकाळी ४:४७ च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
निळकंठ वारिक याने काल (ता.16) सायंकाळी साडे सातच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले होते. काही वेळाने त्याच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने त्याला नातेवाईकांनी तातडीने कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याची प्रकृती खालावल्याने नंतर त्याला कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. तेथून जिल्हा रूग्णालय ओरोस येथे पाठविण्यात आले. मात्र तेथेही प्रकृतीत सुधार होत नसल्याने शहरातील खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी 7.47 च्या सुमारास त्याचे निधन झाले. निळकंठ याने विषारी द्रव्य प्राशन का केले याचा तपास कणकवली पोलिस करत आहेत.
——————

4