सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी अपूर्वा जाधव…

125
2

कणकवली, ता.१७: येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सौ. अपूर्वा जाधव (कणकवली) जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.अर्चना वाडकर (कुडाळ) तर सचिवपदी – सौ. पूर्वा सावंत (देवगड) यांची निवड करण्यात आली. तसेच सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानमार्फत 26 जानेवारी 2020 रोजी कणकवली येथे हळदीकुंकू कार्यक्रम व मेहंदी स्पर्धा घेण्याचे निश्‍चित करण्यात आले .

सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानची पहिली सभा गोपुरी आश्रम वागदे येथे पार पडली सभेसाठी कणकवली, कुडाळ, देवगड, फोंडा येथील महिलांची उपस्थिती होती. सभेत सावित्री बाईंची विचारधारा महिलांपर्यंत पोचविणे आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
नव्या कार्यकारिणीच्या उर्वरित सदस्यांमध्ये खजिनदार सौ. रूपाली कलिंगण (कणकवली), जिल्हा उपाध्यक्ष सौ. सोनाली नारकर (कणकवली), सहसचिव – सौ. संजना कोलते (फोंडाघाट), कणकवली तालुका अध्यक्ष- सौ. वैदही गुडेकर याची प्राथमिक निवड करण्यात आली.

4