प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच विद्यार्थ्यांसाठी झटला…

135
2

मानसी धुरी; सिंधुदुर्ग अवार्ड 2020 शिष्यवृत्ती परीक्षेचे उद्घाटन…

सावंतवाडी,ता.१७:
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक गुणवत्तेसाठी झटणारी संघटना आहे.या संघटनेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम राबविले आहेत,असे प्रतिपादन येथील पंचायत समिती सभापती सौ.मानसी धुरी यांनी केले.माडखोल येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाकडून आयोजित ‘दि स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड’२०२०या शिष्यवृत्ती परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग कडून दि स्कॉलऱ ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड २०२० या इयत्ता ५वी साठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातुन २३००विद्यार्थी तर सावंतवाडी तालुक्यातून ४५०विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.माडखोल केंद्रातील सराव परीक्षेचे उदघाटन पंचायत समिती सभापती सौ.मानसी धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी सभापती रवींद्र मडगावकर,गटविकास अधिकारी गजानन भोसले, माडखोल माजी सरपंच सूर्यकांत राऊळ,गटशिक्षणाधिकारी बोडके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद राऊळ,सावंत,माडखोल केंद्रप्रमुख पवार, केंद्र मुख्याद्यापक अरुण म्हाडगुत आदी उपस्थित होते. राज्य सरचिटणीस म .ल.देसाई सर यांनी आभार मानले.

4