आयकरच्या स्टेटमेंटसाठी “क्लार्क” कडुन तीनशेची “वसूली”

622
2

सिंधुदुर्गनगरी
आयकरचे स्टेटमेंट देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका क्लार्कने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून तीनशे रुपयांची “वसुली” सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
याबाबतची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी केल्यानंतर माझे कायदे करून द्या, तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांना उडवून लावले.त्यामुळे झालेल्या त्रासामुळे तब्बल अडीचशेहून अधिक कर्मचारी नाराज आहेत. याबाबतची माहिती काही कर्मचाऱ्यांनी ब्रेकिंग मालवणीला दिली संबंधित क्लार्क कडून अशा प्रकारे होत असलेली वसुली चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी आपण त्यांना ही प्रकीया करण्यासाठी स्वखुशीने शंभर रुपये देत होतो मात्र त्यांनी हा आकडा अचानक तिप्पट केल्यामुळे कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. याबाबत ते उद्या वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार घालणार आहेत.जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने याबाबतची माहिती दिली त्याच्या म्हणण्यानुसार आपण कर्मचारी असल्यामुळे दरवर्षी आयकरचे स्टेटमेंट हे कार्यालयाकडून देण्यात येते ही सर्व प्रक्रिया मोफत असते.माणुसकी म्हणून आम्ही त्या क्लार्कला शंभर रुपये देत होतो परंतु अचानक त्याने तीनशे रुपयांचा आकडा सांगून वसुली सुरू केले आहे हा सर्व प्रकार चुकीचा आहे याबाबत आम्ही वरिष्ठांकडे दाद मागणार आहोत

4