Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदीवडे, कोईल येथील दहा रॅम्प जमीनदोस्त...

बांदीवडे, कोईल येथील दहा रॅम्प जमीनदोस्त…

 

अनधिकृत वाळू उपशा विरोधात महसूल विभागाची धडक कारवाई…

मालवण, ता. १७ : तालुक्यात अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी राबविल्या कारवाई मोहिमेत बांदिवडे व कोईल येथील दहा अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त केले. तहसीलदार पाटणे यांनी स्वतः कारवाईत सहभाग घेत वाळू रॅम्प उदध्वस्त केले. महसूलचे पथक येत असल्याची माहिती मिळताच खाडीपात्रातून होडीसह कामगारानी पळ काढला.
जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रिया रखडल्याने अनधिकृत वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील खाडीपात्रांमध्ये वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी तहसीलदारांकडे करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी कारवाई मोहीम हाती घेत बांदिवडे, कोईल या भागात धाड टाकली. यात तीन ठिकाणचे दहा वाळू रॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. परप्रांतीय कामगारांच्या दोन झोपड्याही उदध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई पाटणे यांच्या नेतृत्वाखाली डी. एस. सावंत, अरुण वनमाने, मंडळ अधिकारी केशव पोकळे, तलाठी धनंजय सावंत, कोतवाल सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments