भोसले फार्मसी कॉलेजमध्ये उद्या”युफोरिया २०२०”चे आयोजन…

105
2

सावंतवाडी,ता.१८:येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी व यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी फार्मसी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसले फार्मसी महाविद्यालयात युफोरिया २०२० या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उद्या रविवार १९ जानेवारी करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच कला गुण अवगत व्हावे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शैक्षणिक वर्षात विविध विभागात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात केला जातो.
या कार्यक्रमात भोसले फार्मसी महाविद्यालयाचे ६०० विद्यार्थी सहभागी होणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख उद्घाटन म्हणून सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बाळराजे भोसले तसेच हर हायनेस शुभदादेवी भोसले लाभले आहेत.भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष मा.श्री.अच्युत सावंतभोसले,अध्यक्ष ॲड.अस्मिता सावंतभोसले,सेक्रेटरी मा.श्री.संजीव देसाई,प्रशासकीय समन्वयक सौ. सुनेत्रा फाटक तसेच यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी चे प्राचार्य मा.डॉ.विजय जगताप व यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी फार्मसी सावंतवाडी चे प्राचार्य मा.श्री.तुषार रुकारी आदी उपस्थित राहणार आहे.

4