सावंतवाडी बस स्थानक परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक…

1383
2

सावंतवाडी ता.१८: दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत.तर सामोरील दुचाकीस्वार युवकाला किरकोळ दुखापत झाली आहे.ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानक परिसरात घडली.दरम्यान दोन्ही जखमींना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

4