वेंगुर्ला.ता.१८: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वछता, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२० अंतर्गत वेंगुर्ला कॅम्प क्रीडांगण येथे घेण्यात आलेल्या नगराध्यक्ष स्वच्छता चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत जय मानसीश्वर वेंगुर्ला ‘अ’ संघ विजयी ठरला तर मालवण संघ उपविजेता संघ ठरला.
या स्पर्धेचे उदघाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डीचोलकर, नगरसेवक शैलेश गावडे, नगरसेविका शीतल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, पूनम जाधव तसेच बाबली वायगणकर, निलेश चमणकर,पी.के.कुबल आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील १६ संघांनी यात सहभाग घेतला. या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभूत संघ जय मानसीश्वर ब व पाट कोचरा संघ यांचाही सन्मान करण्यात आला. बेस्ट स्मॅशर म्हणून सॅमसन फर्नांडिस, बेस्ट लिफ्टर म्हणून जॉनी फर्नांडिस, बेस्ट ऑलराऊंडर ऋषिकेश तेरेखोलकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समानाधिकारी म्हणून पी आर सावंत (मुंबई), मारुती काशीद (पन्हाळा), अजित जगदाळे, निखिल गावडे, चिरंजीव तोरस्कर, गौरेश वायंगणकर, आकाश साळकर, मंदार गावडे, महेंद्र मोचेमाडकर, हेमंत गावडे यांनी काम पाहिले. तर समालोचन योगेश परब यांनी केले.