एनआरसीसह अन्य कायद्याच्या विरोधात सावंतवाडीत “विराट मोर्चा”…

526
2

आम्ही भारतीय मंचाचे आयोजन;दोन हजारहून अधिक आंदोलकांची असणार उपस्थिती….

सावंतवाडी ता.१८:एन.आर.सी,सी.ए.ए आणि एन.आर.पी आदी कायद्याचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भटक्या जातींसह अन्य समाजाला बसण्याची शक्यता आहे.तर सर्वाधिक जास्त फटका नाव बदलामुळे विवाहित स्त्रियांना बसणार आहे.त्यामुळे या विरोधात आंदोलन उभारणे गरजेचे आहे.यासाठी आम्ही भारतीय नागरिक या संघटनेच्या वतीने दि.२२ जानेवारीला सावंतवाडी जाहीर परिषद आणि विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती या संघटनेचे पदाधिकारी अँड.संदीप निंबाळकर यांनी दिली.दरम्यान या परिषदेला ज्येष्ठ विचारवंत राजकीय विश्लेषक कॉम्रेड अजित अभ्यंकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या मोर्चासाठी सावंतवाडी,दोडामार्ग,वेंगुर्ला व कुडाळ आदी भागातून सुमारे दोन हजार विविध समाजाचे लोक उपस्थित राहतील,असा विश्वास यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.
येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम्ही भारताचे नागरिक या मंचाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.यावेळी पदाधिकारी म्हणाले,शासनाकडू येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम्ही भारताचे नागरिक या मंचाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.यावेळी पदाधिकारी म्हणाले केंद्र शासनाकडून जे कायदे पाडण्याचा प्रयत्न होत आहे.तो सर्व प्रकार चुकीचा आहे, याचा फटका आसाम सारख्या राज्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसणार आहे.जिल्ह्यात मांग,गारुडी,बेरड,डोंबारी,कातकरी असे समाज आहेत.तर मुस्लीम व ख्रिश्चन धर्मामध्ये अनेक पोट जाती आहेत.यातील अनेक लोक हे विस्थापित आहेत.तसेच टोपण नावे असल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसणार आहे.विशिष्ट विवाहित स्त्रियांना या कायद्यामुळे अडचण होणार आहे.त्यामुळे हा सर्व होणारा उपाध्या लक्षात घेता हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आमचे आंदोलन असणार आहे.
पहिल्या टप्प्यात सावंतवाडी येथे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे.असे त्यांनी सांगितले.यावेळी निंबाळकर यांनी सांगितले यावेळी जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो,ऍड.संदीप निंबाळकर,रफिक मेमन,अल्ताफ खान,श्री.डाॅन्टस, महेश परुळेकर,तानाजी वाडकर,समीर बेग,तौकिर शेख,हिदायतुल्ला खान,आसीमपीर
नदाफ,मौसीम मुल्ला, आदी उपस्थित होते.

4