वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सांस्कृतिक महोत्सवाला भव्य शोभायात्रेने प्रारंभ…

117
2

वेंगुर्ला.ता.१८: वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात आज सायंकाळी भव्यदिव्य शोभायात्रेने झाली. या रॅलीत नगरपरिषदेने शाळेच्या सहभागी विद्याथ्र्यांना पुरविलेल्या विविध रंगाच्या स्वच्छतेचा संदेश देणा-या टीशर्टमुळे ही रॅली लक्षवेधी ठरली.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या “स्वच्छता, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव 2020′ या सर्व समावेशक महोत्सवाला 12 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. आज सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ दाभोली नाका ते नगरपरिषद स्टेडियम, कॅम्प-वेंगुर्ला या महोत्सवाच्या ठिकाणापर्यंत भव्यदिव्य शोभायात्रेने झाला.
या शोभायात्रेचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण यांच्या हस्ते दाभोली नाका येथे श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक विधाता सावंत, प्रशांत आपटे, प्रकाश डिचोलकर, शितल आंगचेकर, पूनम जाधव, साक्षी पेडणेकर, कृपा गिरप,कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, दादा सोकटे, सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बाळू देसाई, प्रा.आनंद बांदेकर, माजी नगरसेवक अभि वेंगुर्लेकर, राजेश घाटवळ, शशिकांत परब, शिवसेनेच्या मंजुषा आरोलकर, सामाजिक कार्यकत्र्या सीमा नाईक, आदी उपस्थित होते.
या शोभायात्रेमध्ये केपादेवी भजन मंडळ उभादांडा यांचे भजन, सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे लेझीम पथक, वेंगुर्ला हायस्कूलचे झांज पथक यांच्यासह बॅ.खर्डेकर, होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला हायस्कूल, मदर तेरेसा, एम.आर.देसाई, सिंधुदुर्ग विद्याकनिकेतन तसेच शहरातील वेंगुर्ला नं.1, वेंगुर्ला नं.2, वेंगुर्ला नं.3, वेंगुर्ला नं.4 आणि दाभोस या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. तर वेंगुर्ला नं.2, दाभोस शाळा, वेंगुर्ला नं.3, एम.आर.देसाई, वेंगुर्ला नं.4, केंद्रशाळा वेंगुला नं.1, वेंगुर्ला हायस्कूल आणि सातेरी महिला स्वयंसहाय्यता बचत गट-देऊळवाडा यांनी आपापले स्वच्छता विषयक जनजाजृती करणारे चित्ररथ सादर केले.
यावेळी वेतोरे येथील सिंधुरत्न ढोल पथक, वेंगुर्ला हायस्कूलचे झांज पथक, विद्यानिकेतनचे लेझीम पथक यांनी सादर केलेल्या वाद्यांच्या तालावरील नृत्य व आकर्षक वादन याबाबत नागरीकांतून कौतुक करण्यात येत होते. तसेच वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीच्या रा.कृ.पाटकर हायस्कूलने सर्वधर्म समभाव या थीमवर पारंपरिक वेशभूषेसहीत कला सादर केली. तर काही चित्ररथांनी कचरा स्वच्छतेबाबत प्रात्यक्षिक दाखवित जनजागृती केली.

4