शाळकरी मुलांना ऑफलाइन पास उपलब्ध करून द्या…

78
2

आमदार वैभव नाईक यांची एसटी प्रशासनाकडे मागणी…

कुडाळ ता.१८:शाळकरी मुलांना ऑनलाइन पास देताना अडचणी येत असल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने पास करून देण्यात यावेत,अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांकडे केली.श्री.नाईक यांनी आज येथील बसस्थानकाला भेट देऊन ग्रामस्थ,विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत आगाराच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी उपसभापती जयभारत पालव, संतोष शिरसाट,संजय भोगटे,नगरसेवक सचिन काळप,युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, विभाग प्रमुख बबन बोभाटे,गंगाराम सडवेलकर, कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट, राजू जांभेकर, संदीप म्हाडेश्वर, नीतीन सावंत, विजय परब, प्रकाश म्हाडेश्वर, सुयोग ढवण आदींसह शिवसैनिक व प्रवाशी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शालेय पाससाठी तासंतास रांगेत उभे रहावे लागत आहे.विदयार्थ्यांच्या होणाऱ्या या गैरसोयीबत श्री.नाईक यांनी आक्रमक होत अधिका-यांना यावेळी खडेबोल सुनावले.सर्व्हर डाऊन होत असल्यास मुलांची गैरसोय दूर करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने पास देण्याची व्यवस्था करून दोन दिवसांत सर्व मुलांना शालेय पास उपलब्ध करून द्या अशा सक्त सूचना श्री.नाईक यांनी एस.टी प्रशासनाला दिल्या.

4