नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ; विद्यार्थी सामाजिक संस्थांचा सहभाग…
सावंतवाडी,ता.१९: येथील पालिकेच्या माध्यमातून आज शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानाचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आरोग्य सभापती परिमल नाईक, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दीपाली भालेकर, सुरेंद्र बांदेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भांबुरे पालिकेचे कर्मचारी तसेच विद्यार्थी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
येथील शिवरामराजे पुतळ्याच्या समोर या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.आता शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून शहरातील अंतर्गत भागात टप्प्याटप्प्यानं हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष परब यांनी सांगितले.दरम्यान या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन आरोग्य सभापती श्री.नाईक यांनी केले.