मायकल डिसोझा;पालकमंत्र्यांसह खासदारांकडे मागणी…
सावंतवाडी.ता,१९: येथील
चांदा ते बांदा योजना ही योजना बंद झाल्यास त्याचा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा. गडचिरोली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा सुद्धा या योजनेत समावेश करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य मायकल डीसोझा यांनी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली.नुकतीच श्री डिसोजा यांनी तालुक्यातील पदाधिका-यांसह मुंबईत जावून दोघांची भेट घेतली.
दरम्यान याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,जि.प.सदस्य मायकल डिसोजा,चंद्रकात कासार,अमेय तेडोंलकर,महेश शिरोडकर,सचिन कदम,विक्रांत नेवगी आदी उपस्थित होते.