Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालवणात ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत युवा महोत्सव आमदार चषक २०२०...

मालवणात ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत युवा महोत्सव आमदार चषक २०२० स्पर्धा…

आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आयोजन ; खोबरेकर, गोवेकर, वाडकर यांची माहिती…

मालवण, ता. १९ : आमदार वैभव नाईक यांच्यावतीने कुडाळ व मालवण तालुक्यातील कनिष्ठ- वरिष्ठ महाविद्यालयांसाठी युवा महोत्सव आमदार चषक – २०२० अंतर्गत ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत मालवणात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, भाई गोवेकर, सागर वाडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
मालवण शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. नगरसेवक मंदार केणी, प्रसिद्ध उद्योजक व चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सागर वाडकर, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, अनंत पाटकर, आतू फर्नांडिस आदी पदाधिकारी तसेच किरण करवडकर, देवेन कोळंबकर, अजय आळवे, पंकज कवटकर, अक्षय कदम, प्रवीणकुमार नडगेरी, विजय पेडणेकर, प्रथमेश सामंत, सत्येंद्र दळवी, विशाल मसुरकर, ललित चव्हाण, सौरभ गोलतकर, साहिल कुबल, राजदीप आरोंदेकर, कुणाल केळुसकर, प्रथमेश चव्हाण, वल्लभ पाटकर, लक्ष्मण तावडे, अतुल सांडव, हर्षाली चव्हाण, स्नेहा चव्हाण, उषा यमकर, किरण डोरलेकर, मिताली नेरकर, जान्हवी बिरमोळे, अक्षता गोसावी आदी विद्यार्थी उपस्थित होते.
महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमास पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. युवा महोत्सवात ५ फेब्रुवारीला एकांकीका स्पर्धा पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात होईल. ६ फेब्रुवारीला वैयक्तीक गायन, मिमीक्री यांची प्राथमिक फेरी कुडाळ तालुक्याची संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे होईल. ७ तारखेला वैयक्तीक गायन, मिमीक्री यांची मालवण तालुक्याची प्राथमिक फेरी सिंधुदुर्ग महाविद्यालयात होईल. ८ तारखेला अंतिम फेरी होईल. यात वैयक्तीक गायन, काव्य वाचन, ग्रुप डान्स, मिमीक्री, Ramp वॉक मिस्टर युथ आयकॉन – २०२०, मिस युथ आयकॉन – २०२० स्पर्धा होतील. या स्पर्धांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या प्रथम तीन स्पर्धकाना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये ज्या महाविद्यालयाचे गुण सर्वाधिक असतील त्या महाविद्यालयाला युवा महोत्सव आमदार चषक – २०२० देऊन गौरविण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभास सेलिब्रिटींनाही निमंत्रित केले जाणार आहे. यात परीक्षक म्हणून पुणे येथील राजेश शिंदे उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा कुडाळ- मालवण तालुका मर्यादित असून युवा महोत्सवात सहभागी होऊ इच्छीणाऱ्या महाविद्यालयांनी आपली यादी सादर करावी. अधिक माहितीसाठी किरण करवडकर -९०९६८०९९२८,
देवेन कोळंबकर – ७०३८२४२२१५, सत्येंद्र दळवी -७५८८९५७१९०, हर्षाली चव्हाण- ९५०३५११९०९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments