२१ किलोमिटर मध्ये सुनिल शिवणे, रिया शिंदे, विश्वास चौगुले, वर्षा आंबेरकर प्रथम…
वेंगुर्ला.ता.१९:
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छता, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२० अंतर्गत रन फॉर क्लीन वेंगुर्ला हे ब्रीदवाक्य घेऊन आज रविवारी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय हाफ क्लिनेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. २१ कि.मी. मध्ये खुल्या गटात सुनिल शिवणे, रिया शिंदे, ५० ते ६० वयोगटात विश्वास चौगुले, वर्षा आंबेरकर, ६१ वयोगटावरील निहुतराम विश्वकर्मा यांनी तर १० किमी खुल्या गटात शहाजी शिरुळकर व ममता डिचोलकर, ५० ते ६० वयोगटात उदय महाजन व विद्या शिरसाट, ६१ वरील गटात बजरंग चव्हाण हे उत्कृष्ट धावपटू ठरले.
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छता, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२० अंतर्गत आज रविवारी घेण्यात आलेल्या हाफ राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व खेळाडूंना फ्लॅग दाखवून झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांत उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गंवडळकर, धर्मराज कांबळी, नागेश गावडे, साक्षी पेडणेकर, कृतिका कुबल, पूनम जाधव, कृपा गिरप-मोंडकर, शितल आंगचेकर, शैलेश गावडे, स्नेहल खोबरेकर, डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.नामदेव मोरे, प्रदिप वेंगुर्लेकर, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.आर.एम.परब, डॉ.संजिव लिंगवत, डॉ.महेंद्र सावंत, डॉ.सोनाली सावंत, डॉ.पूजा कर्पे, शिवदत्त सावंत, पराग मणचेकर, मयुर मणचेकर, शशी परब, दिलीप मालवणकर, विठ्ठल मालवणकर, विश्वास पवार, डॉ.रावराणे, डॉ.शंतनू तेंडोलकर, डॉ.प्रशांत माधव, डॉ.अभि वझे, डॉ.किरण पाटणकर, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, दाजी परब, वेंगुर्ला पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील यांचा समावेश होता.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर, प्रा.जे.वाय.नाईक, वाले, दिलीप मालवणकर, विठ्ठल मालवणकर, ऐश्वर्या मालवणकर, किशोर सोन्सुरकर, डॉ.मकरंद काजरेकर, दिगंबर धोंड, विनायक वारंग, निलेश चेंदवणकर, रवी वारंग यांच्यासह जागृती मंडळाचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच वेंगुर्ला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या मॅरेथॉन स्पर्धेचा प्रथम तीन क्रमांकांसह गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे – २१ कि.मी. खुला पुरुष गट सुनिल शिवण, अनितास पवार, अक्षय पडवळ, महिला गट-रिया शिंदे, शर्मिला कदम, स्वप्नाली बेनकर, ५० ते ६० वयोगट-पुरुष-विश्वास चौगुले, भानुदास निकम, डॉ.शंतनू तेंडोलकर, महिला गट-वर्षा आंबेरकर, संगिता उबाळे, अंजना काजरेकर, ६१ वर्षावरील गट-निहुतराम विश्वकर्मा, यशवंत कदम, १० किलोमिटर-खुला पुरुष गट – शहाजी सिरुरकर, सिद्धेश बर्जे, संतोष वेंगुर्लेकर, महिला – ममता डिचोलकर, माधुरी चेचक, सोवल खांडेकर, ५० ते ६० वयोगट-पुरुष – उदय महाजन, प्रविण कुलकर्णी, डॉ.सुधीर राणे, महिला गट-विद्या शिरसाट, डॉ.वसुधा मोरे, ६१ किलोवरील पुरुष गट – बजरंग चव्हाण, डॉ.नामदेव मोरे, मनोहर काजरेकर, ५ किलोमिटर धावणे- पुरुष- कृष्णा गोसावी, समिर वडर, सुजल गिरप, महिला गट-पूजा परब, पुष्पा नाईक, नेहा येरम यांनी यश मिळविले. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक, प्रमाणपत्रक व नगरपरिषद नामोल्लेख असलेले टीशर्ट देऊन गौरविण्यात आले.