वेंगुर्ले.ता.१९: पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या पोलिओ लसिकरण मोहिमे अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाटन वेंगुर्ले परबवाडा येथिल आरोग्य उपकेंद्र येथे पंचायत समिती सभापती सौ. अनुश्री कांबळी यांच्या हस्ते बालकास पोलिओ डोस पाजुन करण्यात आले.
तालुक्यात आज ९५ केंद्रांवर पल्स पोलिओ मोहिम राबवली जात असुन सुमारे ३६०० बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. पोलिओ डोसा पासुन बालके वंचित राहू नये यासाठी आरोग्य प्रशासन, पालक, नागरीक, लोकप्रतिनीधी सहकार्य करीत असून तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम तालुक्यात १००% यशस्वी होणार असल्याचा विश्वास सभापती सौ. कांबळी यांनी व्यक्त केला आहे.