वेंगुर्ला.ता,१९: वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहन चालक, वेंगुर्ला-कॅम्प येथील रहिवासी देवेंद्र उर्फ बंड्या रामचंद्र आरेकर (५८) यांचा काल रात्री कॅम्प परिसरात अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोवा-बांबुळी येथे अधिक उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.
नगरपरिषदेच्या वाहनांवर चालक म्हणून बंड्या आरेकर हे गेली कित्येक वर्षे कार्यरत आहेत. शनिवारी ते रात्रौ ७.३० च्या सुमारास कॅम्प-म्हाडा मार्ग येथून महोत्सवाच्या दिशेने जात असताना नगरपरिषद मॉल इमारतीच्या परिसरात त्यांच्या मोटरसायकल व टॅक्टर यांच्यात अपघात झाला. या अपघातात आरेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना गोवा-बांबुळी येथे नेत असताना वाटतेच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, बहिण, वहिनी, पुतणी असा परिवार आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहन चालक गौरव आरेकर यांचे ते वडील होत. बंड्या आरेकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान १८ जानेवारीपासून वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, प्रशासकीय कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी हे या महोत्सवात गुंतले असतानाच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे आकस्मिक निधन झाल्याने या महोत्सवावर दु:खाचे सावट पसरले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहन चालक बंड्या आरेकर यांचे अपघाती निधन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES