Monday, November 11, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापर्यावरण बालनाट्य महोत्सव २०२० स्पर्धेत देवगडच्या शेठ म.ग. हायस्कूलच्या 'रुसले आहे' एकांकिकेची...

पर्यावरण बालनाट्य महोत्सव २०२० स्पर्धेत देवगडच्या शेठ म.ग. हायस्कूलच्या ‘रुसले आहे’ एकांकिकेची बाजी…

टोपीवालाची ‘कांदळवन छे नंदनवन’ द्वितीय तर जय गणेश इंग्लिश मिडियमची ‘तुम ही हो बंधू’ तृतीय…

मालवण, ता. १९ : मॅग्रोव्ह फाउंडेशन, ईको फोक्स व्हेंचर्स, स्वराध्या फाउंडेशन यांच्यावतीने मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आज झालेल्या जिल्हास्तरीय माध्यमिक आंतरशालेय पर्यावरण बालनाट्य महोत्सव २०२० स्पर्धेत देवगडच्या शेठ म. ग. हायस्कूलच्या ‘रुसले आहे’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. टोपीवाला हायस्कूलच्या ‘कांदळवन छे नंदनवन’ तर जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ‘तूम ही हो बंधू’ या एकांकिकेने द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत शिरगाव हायस्कूलच्या ‘जिथे सागरा धरणी मिळते’ या एकांकिकेस उत्तेजनार्थ तर लक्षवेधी एकांकिका म्हणून रोझरी इंग्लिश स्कूलच्या ‘कांदळवन वाचवा’ या एकांकिकेची निवड करण्यात आली.
मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय आंतरशालेय ग्रीन थिएटर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन जैवविविधता अभ्यासक दुर्गा ठिगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वराध्याचे अध्यक्ष सुशांत पवार, पर्यावरण प्रेमी चंद्रवदन कुडाळकर, लायन्स क्लब अध्यक्ष उदय घाटवळ, परीक्षक क्षितिज झावरे, कला दिग्दर्शक रूपेश नेवगी, पर्यावरणप्रेमी पाबलो विडाल (स्पेन), गौरव ओरसकर, गौरीश काजरेकर, अभय कदम, मुकेश बावकर, सुनील परुळेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन टिकम यांनी केले.
परेश पिंपळे म्हणाले, पर्यावरण रक्षण करून पृथ्वीला वाचविण्यासाठी मुलांमध्ये शालेय जीवनापासून पर्यावरण संवर्धनाची जाणीव व्हावी यासाठी महाराष्ट्रात आठ जिल्ह्यात ग्रीन थिएटर महोत्सव राबविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधतेचा खजिना असून येथील कांदळवनाच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी रंगभूमीवर सादर केलेल्या नाट्यकृतींचे आचरण पर्यावरण संवर्धनासाठी करावे.
कांदळवनांचे संवर्धन व्हायला हवे. राज्याच्या किनारपट्टीवर युएनडीपी, वनविभाग यांच्यावतीने कांदळवनावर संशोधन सुरू आहे. नवीन पिढीपर्यंत येथील जैवविविधतेची माहिती मिळून त्याची जनजागृती व्हावी असे दुर्गा ठिगळे व श्री. कुडाळकर यांनी सांगितले. स्पेन येथील पाबलो विडाल यांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीचे भरभरून कौतुक करताना प्लास्टिकचा वापर मर्यादित करा. शाश्‍वत पर्यावरण अबाधित राखणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. पर्यावरण विषयक जनजागृतीच्या चळवळीत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे असे श्री. घाटवळ यांनी सांगितले.
स्पर्धेचा उर्वरित निकाल असा- दिग्दर्शन- सोनल उतेकर (रुसले आहे-शेठ म. ग. हायस्कूल देवगड), ज्योती तोरसकर (कांदळवन छे नंदनवन- टोपीवाला हायस्कूल), डॉ. राजेंद्र चव्हाण (जिथे सागरा धरणी मिळते- शिरगाव हायस्कूल), लेखन- सोनल उतेकर (देवगड), लक्ष्मण वळंजू (मालवण), राजेंद्र चव्हाण (शिरगाव), उत्कृष्ट अभिनय मुले- शौरीन देसाई (शेठ म. ग. हायस्कूल देवगड), चंदन धुरी (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल), रवींद्र पाटकर (टोपीवाला हायस्कूल), मुली- अनुष्का पोकळे (शेठ म. ग. हायस्कूल देवगड), सांची साटम (शिरगाव हायस्कूल), भूमीका यादव (रोझरी इंग्लिश स्कूल मालवण), तांत्रिक अंग- टोपीवाला हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मारूती विद्यामंदीर जानवली-कणकवली.
स्पर्धेतील विजेत्यांना ज्येष्ठ अभिनेते संजय मोने, दुर्गा ठिगळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments