मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत वैभववाडीतील १६१ विद्यार्थी समाविष्ट…

142
2

वैभववाडी,ता.२०:तालुक्यात पार पडलेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत वैभववाडीतील एकूण १६१ विद्यार्थी समाविष्ट झाले होते. कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालय या केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवी चे विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. केंद्रप्रमुख श्रीमती शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली. ही परीक्षा यशस्वीतेसाठी शिक्षक राहुल गावडे, राहुल अस्पतवार, अमोल सोनवणे, विकास गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
मंथन वेल्थहेअर फौंडेशन अहमदनगर संचलित या संस्थेच्या वतीने ही स्पर्धा राज्यस्तरावर दरवर्षी घेण्यात येते. त्याचबरोबर कोकिसरे केंद्रावर रविवारी गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा ही पार पडली. या परीक्षेला ७४ विद्यार्थी बसले होते. मंथन व गुरूकुल या परीक्षेचा चांगला फायदा शिष्यवृत्ती परीक्षा व एपीजे अब्दुल कलाम या परीक्षेत विद्यार्थ्यांना निश्चित होणार आहे.

फोटो- कोकिसरे येथे मंथन प्रज्ञा शोध परीक्षेत बसलेले विद्यार्थी.

4