संदीप साटम; छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य…
देवगड ता.२०: तालुका मराठा समाजाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.यानिमित्त खास आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून सध्या गाजत असलेला तानाजी चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे,अशी माहिती मराठा समाजाचे नेते संदीप साटम यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान तालुक्यात मराठा समाजाच्या संघटना वाढीसाठी येथील उमाबाई बर्वे लायब्ररीत शनिवार दि.२५ जानेवारी रोजी समाजबांधवांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असेही आवाहन श्री.साटम यांनी यावेळी केले.
यावेळी मराठा समाज बांधव अविनाश सावंत,प्रदीप सावंत,शैलेश कदम, तुषार पाळेकर, केदार सावंत, राजेंद्र भुजबळ, विनोद नलावडे, चेतन जगताप ,सचिन कदम उपस्थित होते.
श्री.साटम पुढे म्हणाले,तालुका मराठा समाजाच्या वतीने यापूर्वी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.त्या उपक्रमांना प्रतिसाद सुद्धा चांगला लाभला आहे.तर आगामी काळात अशा उपक्रमांना गती मिळण्यासाठी मराठा समाजातील बांधवांनी सहकार्याच्या भावनेतून एकत्र यावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाज बांधवांच्या बैठकीत तालुक्यातील अधिकारी समाज बांधवांनी उपस्थित राहावे,असे आवाहन श्री.साटम यांनी केले आहे.