कुडाळ.ता,२०: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने कुडाळ येथील दै.पुढारीचे पत्रकार काशिराम दादू गायकवाड यांना मुंबई येथील महालक्ष्मी सरस कार्यक्रमात गौरविण्यात आले.
एमएमआरडीए मैदान, वांद्रे – कुर्ला काॅम्प्लेक्स मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन 17 ते 29 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन शुक्रवारी (दि.17 जानेवारी रोजी) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री ना. साध्वी निरंजन ज्योती, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार, आ.रमेश पाटील, मावीम अध्यक्षा ज्योती ठाकूर, प्रधान सचिव असीम गुप्ता,एमएसआरएलएमच्या सीईओ आर.विमला, विभागीय आयुक्त (कोकण विभाग) शिवाजी दौंड, नाबार्डचे उदय भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार काशिराम गायकवाड यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उमेद अंतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता समूहांचे कार्यक्रम, उपक्रमांना प्रसिद्धी देणा-या जिल्ह्यातील एका पत्रकाराची दरवर्षी या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
कुडाळचे पत्रकार काशीराम गायकवाड मुंबई येथे पुरस्काराने सन्मानित…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES