कोकण रेल्वेचे प्रश्न सोडवण्यासाठी २६ जानेवारीला मुंबईत आंदोलन…

177
2

डी.के.सावंत; बेलापूर येथील मुख्यालयाच्या ठिकाणी होणार लाक्षणिक उपोषण…

सावंतवाडी.ता,२०: येथील कोकण रेल्वेबाबत विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयाच्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.याबाबतची माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी.के.सावंत यांनी दिली आहे.सकाळी आठ वाजल्यापासून हे उपोषण सुरू होणार आहे.
वारंवार रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधून सुद्धा कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान या आंदोलनाच्या माध्यमातून कोकण रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रवासी व रेल्वे प्रेमींनी उपस्थित रहावे,असे आवाहन श्री.सावंत यांच्या वतीने करण्यात आले.

4