बांद्यात कल्याणकर फाउंडेशनकडून गरजू रुग्णांना वैद्यकिय साहित्य उपलब्ध…

614
2

बांदा ता.२०: येथील कै.डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशनच्या वतीने बांदा दशक्रोशीतील गरजू रुग्णांना वैद्यकिय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.यामध्ये ऑक्सिजन सिलिंडरसह, एअर बेड, वाफ घेण्याची मशीन (नेब्युलायझर) यासह विविध साहित्याचा समावेश आहे.

फौंडेशनची बैठक अध्यक्ष डॉ. दिलीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. प्रसाद कोकाटे, डॉ. तुषार कासकर, डॉ. संजय सावळ, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, फौंडेशनचे सचिव मनोज कल्याणकर, मंगलदास साळगावकर, सुनील धामापूरकर, सिद्धेश पावसकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, निलेश मोरजकर, प्रवीण परब, मंगल कामत, आबा धारगळकर आदी उपस्थित होते.
दशक्रोशीतील गरजू रुग्णांना हे साहित्य मिळावे यासाठी फौंडेशनच्या माध्यमातून ७ जणांची समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये सिद्धेश पावसकर (मो. ९४०५८३९७९९), गुरुनाथ नार्वेकर (मो. ९४२२३७९३४६), राजाराम धारगळकर (मो. ८६९८५४४५४४), सुनील धामापूरकर (मो. ९८६०८११६३०), मंगलदास साळगावकर (मो. ९४२३३१८७६६), डॉ. प्रसाद कोकाटे (मो. ९४२२६३३३४८), मनोज कल्याणकर (मो. ९४२२३७३०३९) यांचा समावेश आहे. गरजूनी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये व्हील चेअर २, फोल्डिंग वॉकर ३, नेब्युलायझर २, कमोड चेअर २, एअर बेड २, बेड १, ऑक्सिजन सिलिंडर २ या वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे.
डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशन हे सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. या सामाजिक कार्यात दानशूर व्यक्ती, दाते यांनीही सहभागी व्हावे. आपल्याकडे विनावापर पडून असलेले वैद्यकीय साहित्य फौंडेशनकडे जमा करावे, जेणेकरून याचा फायदा गरजू रुग्णांना घेता येईल किंवा आर्थिक स्वरूपात मदत द्यायची असल्यास डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशन, बँक ऑफ महाराष्ट्र, बांदा शाखा (खाते क्रमांक ६०३५०२२५८७० आयएफएससी कोड MAHB0000068) या खात्यावर करावी असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

4