वेंगुर्ले येथील सेवा निवृत्त अधिकारी तथा नाट्यकर्मी उन्‍मेष लाड यांचे निधन…

110
2

वेंगुर्ले.ता.२०:  
वेंगुर्ले रामघाट रोड येथील रहीवासी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे माजी सेवा निवृत्त अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नाट्यकर्मी नेपथ्यकार उन्‍मेष मधुकर लाड (वय ६४) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.
वेंगुर्ले येथिल कलावलय संस्थेच्या सचिवपदी तर वेंगुर्ले सेंट लुुुुक्‍स हॉस्‍पीटल गोहीन मेमोरियल चर्च सेक्रेटरी पदी ते कार्यरत होते. सामाजिक तसेच नाट्य क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते. त्यांनी अनेक सामाजिक नाटकामध्ये दर्जेदार भूमिकांसह, नेपथ्यकार म्हणून भूमिका बजावली होती. वेंगुर्ले नाट्य क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कलावलय संस्थेत नविन कलाकार घडवण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता.आज सोमवार २० रोजी धावडेश्वर येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाट्य, सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील विविध व्यक्तींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण, पुतण्या असा परिवार आहे.

4