पाण्यासाठी निधी उपलब्ध असताना तो खर्च होत नाही हे दुर्दैव…

145
2

दीपक केसरकर; येत्या दहा दिवसात अधिकार्‍यांची बैठक बोलावणार…

सावंतवाडी ता.२०: तालुक्यासाठी साडेचार कोटी रुपये निधी नुसता पाण्यासाठी उपलब्ध करून दिला असतानाही तो खर्च होत नाही,हे दुर्दैव आहे.अशी खंत माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केली.दरम्यान या संदर्भात येत्या दहा दिवसात आपण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.येथील तालुका स्कूलमध्ये संभाव्य पाणीटंचाई आराखडा आढावा बैठक आज श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार आजरा म्हात्रे,सभापती मानसी धुरी,उपसभापती शितल राऊळ,जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे,पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर,पंकज पेडणेकर,संदीप नेमळेकर,बाबू सावंत,सरपंच सेवा संघाचे प्रमोद गावडे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.केसरकर पुढे म्हणाले,तालुक्‍यातील पाणीटंचाईचा विचार करता गेल्या वर्षीची मंजूर झालेली कामे बक्षीसपत्रा अभावी रद्द झाली आहेत.त्यामुळे आराखड्यातील मंजूर कामांना जमिनी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी घ्यावी,आवश्यक वाटल्यास ग्रामसभा घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा,आणि असे झाल्यास पाणीटंचाईवर मात करणे नक्कीच सोपे जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले,ज्या गावातून तिलारीचा कालवा जातो,अशा ग्रामपंचायतीनी आवश्यक प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करावा,मात्र ज्या गावातुन कालव्याचे काम सुरू आहे,अशा कामांना विरोध करून ती कामे अडवू नयेत,येत्या पंधरा दिवसानंतर आपण प्रत्यक्षात गावागावात भेट देणार असून तेथील समस्या जाणून घेणार आहे.अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

4