तुळस-वेताळ प्रतिष्ठानच्या नृत्य स्पर्धेत “विश्व डान्स अकॅडमी” चे यश…

110
2

वेंगुर्ले ता.२०: तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या खुल्या समूहनृत्य स्पर्धेत सावंतवाडीच्या “विश्व डान्स अकॅडमी” संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.तर एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात नेहा जाधव व लहान गटात नीरजा माडकर हे स्पर्धक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
या स्पर्धेचे उद्घाटन तुळस जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान खुल्या समूह नृत्य स्पर्धेत “ओंकार डान्स ॲकॅडमी,सावंतवाडी” यांनी द्वितीय तर “एम.जे.डान्स ॲकॅडमी,सावंतवाडी” यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात पूजा राणे-द्वितीय व दीप्ती तुळसकर-तृतीय तर लहान गटात लतिका चमणकर-द्वितीय व भक्ती सावंत-तृतीय आदींनी यश मिळवले.या नृत्य स्पर्धेचे परीक्षण राहुल तोडकर व सुरज म्हाळगे यांनी केले.

4