मंत्रीपद मिळाले असते तर….तीन वर्षांत राजीनामा दिला असता…

2

दीपक केसरकर;राजकारणातून निवृत्त होणार नाही तर अधिक काम करेन…

सावंतवाडी.ता,२०: येथील
मला मंत्रिपद मिळाले नसले तरी मी नाराज नाही.परंतू मिळाले असते तर मी तीन वर्षांनी आमदारकीचा राजीनामा देऊन इच्छुकांना संधी दिली असती. परंतु आता या पुढची वाटचाल आमदारकीच्या माध्यमातून संघर्ष करेन असे मत आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले.भाजपात येण्यासाठी ऑफर देणाऱ्या प्रमोद जठार यांचा आपण आदर करतो. मात्र पक्षाने घेतलेली भूमिका मला मान्य आहे असे सांगत. निवडणुकीपूर्वी जरी मी राजकारणातून निवृत्ती घेईन असे जाहीर केले असले.तरी आत्ताचे विरोधकांचे आव्हान लक्षात घेता पक्ष वाढीसाठी मला काम करावे लागेल असे केसरकर म्हणाले ते आज या ठीकाणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

त्यावेळी केसरकर पुढे म्हणाले आपण काही झाले तरी चांदा ते बांदा योजना बंद पडू देणार नाही. येणाऱ्या काळात अधिक जोमाने काम करण्यात येईल. या योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न केले जाते.अनेक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ही योजना भविष्यात रत्नागिरी व गडचिरोली व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येईल.
मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. जर मला मंत्रिपद मिळाले असते तर इच्छुक असलेल्यांना तयार करण्यासाठी मी तीन वर्षात राजीनामा दिला असता आणि त्यांना त्या ठिकाणी संधी दिली असती. परंतु आता काही मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे आता नुसते बोलून योग्य नाही तर जी कामे थांबली आहे पूर्ण करून घेण्यासाठी आमदारकीच्या माध्यमातून मी संघर्ष करत राहणार आहे.
प्रमोद जठार यांनी केसरकरांना भाजपची अशी ऑफर दिली होती याबाबत श्री केसरकर म्हणाले जठार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या ऑफरचा मी अनादर करत नाही. परंतु मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात समाधानी आहे पक्षनेतृत्वाने घेतलेला निर्णय मला मान्य  आहे यापूर्वीसुद्धा मी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो होतो त्यावेळी त्यांनी सुद्धा तुम्हाला कोणत्याही पक्षात जा असे सांगितले परंतु शिवसेनेला गोरगरिबांची कळवळा असल्यामुळे मी शिवसेनेत आलो त्यामुळे आता कुठेही जाणार नाही तरीही मी जठार यांचा आदर करतो मागच्या पालिका निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेला कमी मते मिळाली अवघ्या सव्वा तीनशे मतांनी येथील उमेदवाराचा पराभव झाला त्यामुळे आता मी पुन्हा एकदा जोमाने काम करणार आहे त्यामुळे मी यापूर्वी निवृत्ती घेण्याचे जाहीर केले असले तरी जोमाने काम करण्याचा माझा मानस आहे.

2

4